Maharashtra political crisis : हे खिचडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही - यशोमती ठाकूर - अजित पवार उपमुख्यमंत्री
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - महाराष्ट्रात सध्या जे खिचडी सरकार स्थापन झाले आहे त्याला काही अर्थ नसून हे खिचडी सरकार टिकणार नाही, असे माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. आम्ही काँग्रेस पक्षाचे पाईक आहोत. आम्ही आमच्या विचारांवर कायम आहोत. आम्ही जनमताचा असा अपमान कधीही सहन करू शकत नाही. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन देतो की एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनहिताचे काम सातत्याने करत राहू, असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. महाराष्ट्रात संविधानाची तोडफोड होत असल्याची टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. आता असा प्रकार सहन केला जाणार नाही, आम्ही संविधानाचा मान राखला जावा याकरिता सक्षम विरोधी पक्ष म्हणून कार्य करू असे त्या म्हणाला.