Aslam Sheikh Met Deputy CM Devendra Fadnavis : काँग्रेस नेते अस्लम शेख-देवेंद्र फडणवीस यांची भेट, राजकीय चर्चेला उधाण - अस्लम शेख व देवेंद्र फडणवीस भेट

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 1, 2022, 10:40 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

मुंबई : काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीमधील माजी मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईतील सागर बंगला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला मोठे उधाण आले आहे. काॅंग्रेसचे असलेले नेते भाजपच्या प्रमुख नेत्यांना भेटल्याने राजकीय वातावर ढवळून निघाले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना आता ईडीची घरघर लागू शकते, याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी अस्लम शेख यांच्यावर 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यापैकी किरीट सोमय्या यांनी 300 कोटींची कागदपत्रे सादर केली होती. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडीओ आहेत. ज्यात CRZ नियमांच उल्लघन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मंत्री असलेले काॅंग्रेसचे अस्लम शेख यांच्यावर मागेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. याच भीतीने कदाचित काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत भाजप नेते मोहित कंबोजदेखील उपस्थित होते. मोहित कंबोज हे भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. आता त्यांच्या एकत्रित भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.