Tunisha Sharma Suicide : अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरण; वकील म्हणाले... - Sheezhan Khan
🎬 Watch Now: Feature Video
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने TV actress Tunisha Sharma एका टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या Tunisha Sharma committed suicide केली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील तिचा प्रियकर शीझान खान याला वालीव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तुनीषा आणि शीझान खान हे प्रेमसंबंधात होते मात्र 15 दिवसांपूर्वी काही कारणावरून शीझानने तुनीषा सोबत ब्रेकअप केले होते. या नैराश्यातूनचं तुनीषा हिने शूटिंगच्या सेटवरील मेकअप रूममध्ये आत्महत्या केल्याचा आरोप तुनीषाच्या आईने केला आहे. तुनीषाच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी सैजाण विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज सकाळी 11 च्या सुमारास हॉलिडे कोर्टात हजर केले. यावेळी झालेल्या युक्तिवादात आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्याला 28 रोजी न्यायालयात हजर करणार असल्याचे शीझानचे वकील रुपेश जयस्वाल यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST