CM Shinde On Irshalwadi : मुख्यमंत्री शिंदे दीड तास चालत पोहोचले इर्शाळवाडीत; मदतकार्याचा घेतला आढावा - इर्शाळवाडी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 20, 2023, 4:02 PM IST

Updated : Jul 20, 2023, 4:13 PM IST

रायगड : जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः चालत घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी पोहचून त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्याचा आढावा घेतला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून मदतकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्थनिक नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘एनडीआरएफ’ पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग देण्यासाठी, काही तरुण स्वतःहून पुढे आले आहेत. रायगड जिल्ह्यातील यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह एमआयडीसीमध्ये काम करणारे पाचशेहून अधिक मजूर या मदतकार्यात स्वतःहून सहभागी झाले आहेत. याशिवाय जखमींवर उपचार करण्यासाठी तसेच लोकांचे गडाच्या पायथ्याशी तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी रत्नागिरीहून 10 कंटेनर देखील मागवण्यात आले आहेत. तसेच गावकऱ्यांनी स्वतःहून दुर्घटनाग्रस्त गावातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असून जेवण, पिण्याचे पाणी आणि इतर सामुग्री पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

Last Updated : Jul 20, 2023, 4:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.