Chitra Wagh In Kolhapur: सुप्रियाताई सुळेंनीही निर्भया पथकातील गाडी वापरली; चित्रा वाघ यांची टीका - women safety in maharashtra bjp
🎬 Watch Now: Feature Video
Chitra Wagh In Kolhapur कोल्हापूर आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 पैकी 45 आणि विधानसभेला 288 पैकी 200 जागा जिंकू असा विश्वास भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ BJP women state president Chitra Wagh यांनी व्यक्त केला आहे. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांनी सकाळी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. तसेच पक्षाने मला प्रदेश महिला अध्यक्षाची जबाबदारी दिल्यापासून मी महाराष्ट्र दौरा करत असून हा माझा शेवटचा टप्पा आहे, असे म्हणत महिला सुरक्षा हा आमचा अजेंडा असल्याचे ही ते म्हणाले आहेत. तसेच भाजपचे नेते हेकडी नाहीत भाजपमध्ये सगळ्यांचे सल्ले ऐकून घेतले जातात. चांगला सल्ला असेल तर स्वीकारतात, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्रावर दिली होती. लव्ह जिहादची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुध्दा लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यापूर्वीच आम्ही ही मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार, बलात्कार, विनयभंगाचे प्रकार घडत होते. परंतू ते सरकार सक्षम, संवेदनशील नव्हते. आजही राज्यात अशा घटना घडत आहेत. परंतु शिंदे-फडणवीस सरकार सक्षम आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST