Chief Minister Gehlot : महिलेशी बोलताना माईक बंद होताच मुख्यमंत्री गेहलोतांचा राग अनावर, पहा काय केले? - मुख्यमंत्री गेहलोत यांनी माईक फेकला
🎬 Watch Now: Feature Video
बाडमेर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे किती कडक स्वभावाचे आहेत, याचे उदाहरण समोर आले आहे. मुख्यमंत्री गेहलोत काही अडचण आली ते किती चिडचीड करतात याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या बाडमेर दौऱ्याचा. मुख्यमंत्री गहलोत हे शुक्रवारच्या रात्री सर्किट हाऊसमध्ये महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना माईकमुळे राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात माईक भिरकावून फेकून दिला.
गहलोत यांना राग का आला : मुख्यमंत्री अशोक गेहलोत बाडमेरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री गेहलोत शुक्रवारी रात्री सर्किट हाऊसमध्ये महिलांशी संवाद साधत होते. यावेळी कॅबिनेट मंत्री हेमाराम चौधरी, आमदार हरीश चौधरी, आमदार मेवाराम जैन, आमदार पद्माराम मेघवाल उपस्थित होते. याच दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दोनदा राग आल्याचे दिसले. त्याचे झाले असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी महिलांशी संवाद साध होते. शासनातर्फे महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी दिली. पण बोलताना अचानक मुख्यमंत्र्यांच्या हातातील माईक बंद पडला. मुख्यमंत्र्यांनी महिलांकडून माईक मागितला. त्यानंतर त्यांच्या हातात असलेला खराब माईक रागाच्या भरात खाली फेकला. खाली फेकलेला माईक जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला.
महिलांवर आला राग : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री गेहलोत यांना राग आला जेव्हा त्यांच्याशी एक महिला बोलत होती. यादरम्यान महिलांच्या मागे उभी असलेली अनावश्यक गर्दी पाहून मुख्यमंत्री गेहलोत संतापले. त्यावेळी त्यांनी एसपी कुठे आहेत, याची विचारणा केली. त्यानंतर गेहलोत म्हणाले की दोन्ही एसपी आणि जिल्हाधिकारी सारखेच दिसतात! त्यानंतर गेहलोतांनी महिलांकडे मोर्चा वळवला. महिलांच्या मागे उभ्या असलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी विचारले तुम्ही कोण आहात सांगा, तुम्ही का उभे आहात? येथून निघून जा. दरम्यान दोन दिवसीय बाडमेरच्या दौऱ्यावर असलेल्या गेहलोत यांनी महिलांना शासनाच्या योजनांविषयी माहिती दिली. राज्य शासनाकडून महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देताना गेहलोत यांनी उडाण योजनेचे फायदे सांगितले. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५ टक्के वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याबद्दल अंगणवाडीतील महिलांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आभार मानले. महिला संवाद कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हेही वाचा -