Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज-उद्या औरंगाबादेत, कुठे मेळावे, कोणत्या बैठका, वाचा सविस्तर! - Aurangabad Political
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. वैजापूर तालुक्यात साखर कारखान्याचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. औरंगाबाद मधून शिंदे गटात गेलेल्या 5 आमदारांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. शिंदेंच्या मेळाव्यात शिवसैनिकांची जोरदार गर्दी पाहण्यासारखी असेल, असे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी जवळपास 1200 पोलीस कर्मचारी तैनात असतील. यात 50 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आज संध्याकाळी ते औरंगाबादच्या वैजापूर येथे 5 वाजेपर्यत येतील आहेत. तर रविवारी दिवसभर त्यांचे ठिकठिकाणी भेटी- गाठी आणि मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे ज्या- ज्या ठिकाणी जाणार आहेत, त्या ठिकाणी आणि मार्गावर आज सकाळपासूनच बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST