CM Eknath Shinde Reaction : संजय राऊत यांच्या प्रकरणात चौकशीअंती सत्य नक्की समोर येईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Chief Minister Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15979637-thumbnail-3x2-cm.jpg)
औरंगाबाद : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते (Shiv Sena Chief Spokesperson ) आणि सामनाचे संपादक संजय राऊत ( Saamana Editor Sanjay Raut ) यांना ईडीने अटक केली ( ED has Arrested ) असली तरीही चौकशीअंती जे सत्य आहे ते नक्की समोर येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde Reaction ) यांनी दिलेली आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राऊत यांनी आपल्यावर आणि आपल्यासोबत असलेल्या ५० आमदारांवर अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका ( Sanjay Raut Criticized on Rebel 50 MLA ) केलेली असली तरीही आम्ही तसे काही करणार नाही. आमच्या कामातूनच आम्ही त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर देऊ, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याची सांगता आज अखेर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. रात्री तीन वाजता शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन करून मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष विमानाने मुंबई गाठली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST