सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जवानांचं स्मरण करुन गायलं ख्रिसमस कॅरोल; पाहा व्हिडिओ - ख्रिसमस डे
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 25, 2023, 2:28 PM IST
नवी दिल्ली Chief Justice of India DY Chandrachud Sings Christmas Carols : भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिल्लीतील सुप्रीम कोर्टात ख्रिसमस डे कार्यक्रमात भाग घेतला आणि ख्रिसमस कॅरोल गायलं. यावेळी ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी आपण आपल्या सशस्त्र दलाचे चार सदस्य गमावले आहेत. म्हणून आपण ख्रिसमस साजरा करत असताना, सीमेवर असलेल्यांना विसरु नये. जे आपले आणि आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी या कडाक्याच्या थंडीत सकाळ घालवत आहेत. आम्ही जेव्हा गातो तेव्हा उत्सवात त्यांच्यासाठीही गातो, असंही सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गायलेलं कॅरोल आता व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम सुप्रीम कोर्ट बार असोसिएशननं आयोजित केला होता. त्याचे प्रमुख पाहुणे सरन्यायाधीश चंद्रचूड होते.