Chhagan Bhujbal in Beed : 'जाळपोळ प्रकरणाची चौकशी...', नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 2:13 PM IST

बीड Chhagan Bhujbal in Beed : मंत्री छगन भुजबळ हे आज (6 नोव्हेंबर) बीड दौऱ्यावर आहेत. भुजबळांच्या समता परिषदेचे बीड जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी सुभाष राऊत यांचं सनराईज हॉटेल आणि बीडमधील माजलगावचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर मराठा आंदोलकांनी पेटवून दिलं होतं. या दोन्ही ठिकाणांची पाहणी भुजबळांनी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना छगन भुजबळ म्हणाले की, आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवल्याची घटना जेव्हा मला समजली तेव्हा ॲड. सुभाष राऊत हे माझ्यासोबत मंत्रालयात होते. त्याचवेळी मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून कल्पना दिली होती की सुभाष राऊतांच्या हॉटेलवर दगडफेक होऊ शकते. त्यानंतर चार तासानं हा प्रकार घडला. इतका वेळ मिळून देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आला नव्हता, यातच पोलिसांचं अपयश दिसतं.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.