Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे येवल्यात जंगी स्वागत; जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण... - Chhagan Bhujbal grand welcome
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : कॅबिनेट मंत्रीपदी छगन भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर आज ते येवला मतदारसंघामध्ये आले असता, ठिक ठिकाणी समर्थकांनी भुजबळांचे स्वागत केले. यावेळी अंगणगाव येथे 200 किलोचा हार घालत, जेसीबीच्या साह्याने भुजबळांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच भव्य रॅली देखील यावेळी काढण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भुजबळांनी महापुरुषांच्या पुतळ्यांला अभिवादन देखील केले. येवला शहरातील अंगणगाव येथून स्वागत मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. ठिक ठिकाणी नागरिकांनी भुजबळांचे स्वागत केले. याप्रसंगी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भुजबळांनी अभिवादन केले. नाट्यगृह येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास देखील अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक मिरवणुकीला उपस्थित होते.