Bawankule Gram Panchayat Election Result Reaction : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप अव्वल; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा - भाजपची ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर (Gram Panchayat Election Result Announced) झाला आहे. या निकालात भारतीय जनता पक्षाची जोरदार सरशी (BJP Lead in Gram Panchayat Election) झाली असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule Gram Panchayat Election Result Reaction) यांनी केला आहे. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ५८१ पैकी तीनशे जागांवर भाजपचे सरपंच निवडून आले आल्याचा दावा (People Faith in Shinde Fadnavis Govt) त्यांनी केला आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होऊन अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरी देखील राज्यातील जनतेने शिंदे फडणवीस सरकारवर जनतेने मतदानाच्या माध्यमातून विश्वास व्यक्त केला असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट सरपंच निवड किंवा बहुसदस्य प्रभाग पद्धतीला तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रभाग पद्धतीमुळे लोकशाही धोक्यात आल्याची टीका देखील त्यांनी केली होती. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रभाग रचनेच्या संदर्भात महाविकास आघाडीने चुकीचा निर्णय घेतला होता. मात्र, आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर तो निर्णय आता बदलण्यात आला आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Result)
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST