Video: मुनगंटीवारांनी धरला गोंडी नृत्यावर ठेका; राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मु विजयी झाल्याचा आनंद - आदिवासी नृत्य
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर : एरव्ही राजकारणात फटकेबाजी करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी गोंडी लोकगीताच्या तालावर ठेका घेत नृत्य केले. औचित्य होते राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवार द्रौपदी मुर्मु ह्या विजयी होण्याचे. यानिमित्त भाजपच्या आयोजित कार्यक्रमात आदिवासी नृत्य सादर करण्यासाठी चमू आली होती. यावेळी मुनगंटीवारांनी त्यांना साथ देत काही क्षण नृत्याचा आनंद लुटला.
गुरूवारी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक पार पडली. यात भाजपतर्फे आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मु ( President Draupadi Murmu ) या अधिकृत उमेदवार ,तर संयुक्त पुरोगामी आघाडीकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार होते. मात्र द्रौपदी मुर्मु ह्या मोठ्या फरकाने जिंकल्या. यानिमित्त शहरातील गांधी चौक येथे भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाषण दिल्यानंतर मुनगंटीवार हे व्यासपीठाच्या खाली उतरले. यापुर्वी आदिवासी समाजाची संस्कृती असलेले गोंडी नृत्य ( Gondi Dance ) चमूने सादर केले होते. मुनगंटीवार खाली उतरले असता त्यांनी या चमुसोबत फोटो घेतले. मात्र अचानक मुनगंटीवार यांच्या समर्थकांनी त्यांना नृत्यात सामील होण्याचा आग्रह केला. यावेळी मुनगंटीवारांनी लगेच होकार देत गोंडी नृत्याच्या तालावर चमुला साथ देत ठेका धरला. काही क्षण त्यांनी ह्या नृत्याचा आनंद लुटला आणि वातावरण हलके झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST