Pune Accident CCTV ट्रॅक्टरचा दुचाकीला धक्का लागल्याने अपघात, 6 महिन्याच्या बाळाचा जमिनीवर पडून मृत्यू - ट्रॅक्टर दुचाकीचा अपघातात
🎬 Watch Now: Feature Video
Pune Accident पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात ( Tractor and two wheeler accidents) एका सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. याबाबत अद्याप कोणावर ही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती खेड पोलिसांनी ( Khed Police ) दिली आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुपारी राजगुरूनगर येथील वाडा रोड येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजारी सहा महिन्याच्या बाळाला घेऊन निघालेल्या आई, वडिलाच्या दुचाकीला ट्रॅक्टरचा धक्का लावून अपघात झाला. यात सहा महिन्याच्या बाळाचा ट्रॅक्टरखाली येऊन मृत्यू झाला आहे. आईच्या समोरच बाळाचा मृत्यू झाल्याने आईने हंबरडा फोडला. ही घटना काल दुपारी घडली आहे. या घटनेमुळे स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अपघातानंतर अनेकांनी घटना पाहूनच डोक्याला हाथ लावला. दरम्यान, ट्रॅक्टरचालक मात्र अपघात घडल्यानंतर देखील तिथून निघून गेला आहे. अद्याप याबाबत तक्रार प्राप्त झाली नाही, पण घटनेची चौकशी करणार असल्याचे खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी ई टीव्हीशी बोलताना सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST