Bus accident In Ghaziabad : गाझियाबादमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उड्डाणपुलावरुन पडली; पहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 11:02 PM IST

thumbnail

नवी दिल्ली/गाझियाबाद Bus accident In Ghaziabad : दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेवर (NH-9)   पुन्हा एकदा हृदयद्रावक अपघात घडलाय. मेरठहून दिल्लीला जाणाऱ्या रोडवेज बसचे नियंत्रण सुटल्याने ही बस हवा हवाई रेस्टॉरंटजवळ दुभाजक तोडून खाली कोसळली.  आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ पोलिसांना या घचनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे सुत्रांनी सांगितलंय. 

काय म्हणाले प्रवासी : अपघातात जखमी झालेल्या मोहम्मद सादिकने सांगितले की, बस शेतात पडण्यापूर्वी एका खांबाला धडकली होती. मी बसमध्ये झोपलो होतो.  अचानक मला लोकांचा आवाज ऐकू येऊ लागला. जेव्हा मी जागा झालो तेव्हा मी पाहिले की मला दुखापत झाली होती.  मी खाली पडलो होतो. त्यानंतर काय झाले ते आठवत नाही. बसमध्ये उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की चालकाला डुलकी लागली आले होती. त्यामुळे हा अपघात झाला.

"गाझियाबादच्या मसुरी पोलिस स्टेशन अंतर्गत दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवर असलेल्या हवा हवाई रेस्टॉरंटजवळ संध्याकाळी एक रोडवेज बस मेरठहून दिल्लीकडे जात होती. ती नियंत्रणाबाहेर गेली, एक्स्प्रेस वेवरील दुभाजक तोडून खाली पडली. यात सुमारे 20 लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेद्वारे संजय नगर येथील संयुक्त रुग्णालय आणि सर्वोदय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे."  - नरेश कुमार, एसीपी मसुरी

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.