Bull Fight Competition In Samnapur: समनापूर गावात दिवाळी पाडव्याला रेड्यांची टक्कर स्पर्धा, कार्यक्रमाला हजारो लोकांची गर्दी - रेड्यांची टक्कर स्पर्धा समनापूर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 15, 2023, 9:55 PM IST
बीड Bull Fight Competition In Samnapur : दिवाळी पाडव्याच्या निमित्त बीडच्या समनापूर गावात रेड्यांची टक्कर आयोजित केली होती. याची परंपरा अनेक वर्षांपासून आजही या गावानं जोपासली आहे. गवळी समाजाचे लोक एकत्रित येत ही स्पर्धा आयोजित करतात. (Bull fight in Samnapur village) यावर्षी या स्पर्धेत राज्यातून स्पर्धकांनी भाग घेतला होता. (Diwali 2023) रेड्यांची टक्कर पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. बीड शहरापासून जवळच असलेल्या समनापूर डोंगरातील या गावात खुल्या मैदानावर ही स्पर्धा झाली. (Bull competition on occasion of Diwali)
पुण्यात रंगले रेड्यांचे प्रदर्शन: पुण्यातील गणेशपेठेत पुणे शहर आणि जिल्हा दुग्धव्यवसायिक संघाच्यावतीनं 'सगर' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये गवळी समाजाकडून त्यांच्याजवळ असलेल्या जनावराला फुले, मोरपीस तसेच अंगावर विविध स्टाईलची कटिंग करत शरीरावर तसेच शिंगांवर विविध कलर लावून डिजे, ढोल तसेच बँड पथक घेऊन जाऊन रेड्यांचा प्रदर्शन करण्यात आलं. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून हा 'सगर' उत्सव साजरा करण्यात येत आहे.