Keshav Upadhyay: भाजपचा महाविजय 2024 संकल्प, त्यादृष्टीने आजची बैठक महत्त्वाची- केशव उपाध्ये - meeting of BJP in Pune in presence of JP Nadda
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील मार्गदर्शन होणार आहे. बैठकीनंतर सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचा महाविजय 2024 हा एक संकल्प आहे. त्यादृष्टीने पुण्यात आज महत्त्वाची बैठक होत आहे. आजच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रास्ताविक करणार आहे. आजच्या या बैठकीत बूथ सशक्तीकरण अभियानाचा आढावा, मोदी @ नऊ.. मोदी सरकारच्या नऊ वर्षांची कारकीर्द नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महा जनसंपर्क अभियानाची घोषणा तसेच राजकीय प्रस्ताव यावर राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन होणार आहे.
पुढील वर्षभरात जेवढ्या निवडणुका होणार आहे. त्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही विजयी होणार आहे. यासाठीच आजची ही बैठक असल्याचे यावेळी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.