Dog Beating Viral Video: एका तरुणची रस्त्यावरील कुत्र्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल - कुत्र्याला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
🎬 Watch Now: Feature Video
भोपाळ (मध्य प्रदेश) : राजधानीत रस्त्यावरच्या कुत्र्याला (भटक्या कुत्र्याला) बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरील कुत्र्याला मारत असल्याचे दिसत आहे. त्या कुत्र्याला वारंवार एकाच ठिकाणी बेदम मारल्याने त्या कुत्र्याची या मारहाणीत पाठ मोडली आहे. यावेळी कुत्रा मोठ्याने ओरडत असल्याचेही समोर आले आहे. हा व्हिडिओ २४ तारखेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर सामाजिक पाळीव प्राणी प्रेमी कविता यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडीओ इक्बाल मैदान भागातील आहे. हा तरुण कोण आहे आणि तो असे का करत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. भोपाळमध्ये रस्त्यावरील कुत्र्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या मुलांना जाळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.