Bawankule On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सरकार यांनीच मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला, बावनकुळेंचा आरोप - Maratha reservation
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 2, 2023, 4:50 PM IST
बुलडाणा Bawankule On Uddhav Thackeray : जालना येथे काल मराठा आंदोलकांवर (Uddhav Thackeray govt) झालेल्या लाठीचार्ज नंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. याला गृहमंत्र्यांच्या आदेशामुळेच मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. (Maratha reservation) दरम्यान बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, जे उद्धव ठाकरे (Bawankule On Uddhav Thackeray) आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलत आहेत, त्यांनीच या मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला. त्यांना यावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. तसंच देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मनाचे आहेत, ते असं कृत्य करू शकत नाहीत, (Bawankule criticism Uddhav Thackeray) असंही ते पुढे म्हणाले. उद्धव ठाकरे हे फेसबुकवर राहणारे नेते आहेत. ते आता बाहेर निघाल्यामुळे बावचळल्यासारखे करत आहेत. तसंच (Bawankule on Maratha Reservation) उद्धव ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये मराठा समाजाबाबत सुप्रीम कोर्टात योग्य बाजू न मांडल्यामुळेच ते आरक्षण डॅमेज झालं, असेही बावनकुळे म्हणाले.