Thorat on Pawar : शरद पवार यांना बाजूला जाऊन चालणार नाही - थोरात - संविधान वाचवण्याकरता शरद पवार
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर: ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशाची लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या युद्धात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे महत्त्व मोठे असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. देशाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर बोलताना आमदार थोरात म्हणाले, की देश सध्या ज्या परिस्थितीतून जातो आहे. अशा अडचणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना वाढवण्यासाठी नवीन युद्ध सुरू आहे. यामध्ये पवार साहेबांचे मोठे महत्त्व आहे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लढाई करत आहे. त्यांच्या या लढाईत साथ देणारी देशपातळीवरील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शरद पवार आहेत. त्यामुळे देशाच्या लोकशाही करता संविधान वाचवण्याकरता शरद पवार यांनी सक्रिय राहणे अत्यंत गरजेचे आहे. ते या लढाईत महत्त्वाची व्यक्ती असल्याचे त्यांना बाजूला जाऊन चालणार नाही असे, आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.