Ashadhi Wari 2023 : माऊलींकडे काही मागायचे नसते, जे मनात असेल ते माऊली करते - देवेंद्र फडणवीस - डीसीएम देवेंद्र फडणवीस
🎬 Watch Now: Feature Video
सातारा : जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण तालुक्यातील बरड येथील तळावर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माऊलींच्या पालखीचे सारथ्य केले. माऊलींकडे काही मागायचे नसते. आपल्या मनात जे जे असते ते माऊली करत असते. मी फक्त आशिर्वाद मागितल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले. फडणवीस म्हणाले की, माऊलींचे सारथ्य करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्यासाठी हा भागयाचा दिवस आहे. माऊलींकडे येणारा प्रत्येकजण हा वारकरी आहे. मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री किंवा साधा माणूस असो, पद कुठलेही असले तरी सगळे वारकरी आहेत. सोहळ्यात आत्मिक आनंद आहे. ही सर्व पुण्यवान लोक आहेत. त्यांचे पुण्य थोडे आपल्याही मिळत, असल्याचे फडणवीस म्हणाले. सध्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला वारकरी जात आहे. गावा-गावातून दिंडी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करत आहेत.