Ashadhi Ekadashi 2023 : विठुरायाच्या भजनात दंग झालेली 'ती' चिमुकली शिर्डीची; पाहा व्हिडिओ - चिमुकली वारकरी स्वरा कदम व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - वारकऱ्याच्या वेशात विठुरायाच्या भजनात दंग झालेल्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियासह इतर प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या चिमुकलीचा अखेर 'ई टीव्ही भारत'ने शोध लावला आहे. गोड हास्याने सर्वांनाच वेड लावणारी चिमुकली शिर्डीतील कदम कुटुंबियातील आहे. स्वरा असे या चिमुकलीचे नाव आहे. स्वरा ही शिर्डीतील साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक किशोर कदम यांची नात आहे.
किशोर कदम सरांनी आपल्या शालेय कारकिर्दीत अनेक मुलामुलींना नृत्याचे धडे दिले आहेत. साईबाबांच्या गुरुवारच्या पालखी आणि साई संस्थानच्या इतर महत्त्वाच्या उत्सवांना चिमुकल्या मुलांना राम, कृष्ण, हनुमान, राधा बनवत त्यांच्याकडून सुंदर असे नृत्य करवून घेण्याचे कौशल्य कदम सरांना अवगत होते.