Attack On Businessman Office: दोन कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - जमीन व्यावसायिक जितेंद्र यादव
🎬 Watch Now: Feature Video
पालघर : वसई विरारमधील जमीन व्यावसायिक जितेंद्र यादव यांच्यावर दोन कोटींच्या हफ्ता वसुलीसाठी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील त्यांच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा सर्व थरार कार्यालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास जितेंद्र यादव यांच्या कार्यालयावर आठ ते दहा अज्ञात तरुणांनी घुसखोरी करून हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या दोन वाहनांची देखील तोडफोड केली आहे. या हल्लेखोरांनी तलवार, लोखंडी रॉडचा वापर करून दहशत पसरविण्यासाठी हल्ला केल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसत आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अंकुश भुवन नामक व्यक्ती जखमी झाला आहे. त्यांच्यावर मीरा रोड येथील युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती नायगाव पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.