Elephant Hand Pump Video : उष्णतेने त्रस्त हत्तीने स्वत: हातपंप चालवून भागवली तहान! पाहा व्हायरल व्हिडिओ - आंध्र प्रदेशातील हत्तीचा व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेमुळे लोकांचे हाल होत आहेत. उन्हाच्या तडाख्याने मनुष्यांसह प्राणीही हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत आंध्र प्रदेशातील पार्वतीपुरम मन्यम जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उष्णतेने त्रस्त असलेला एक हत्ती हातपंप चालवून तहान भागवताना दिसत आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी कोमर्डा मंडळाच्या वन्नम गावात घडली होती. स्थानिक लोकांनी हत्तीची तहान भागवतानाचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. सुमारे चार वर्षांपूर्वी या गावाजवळील जंगलात 8 हत्तींचा कळप शिरला होता, असे सांगितले जाते. तेव्हापासून तो कळप कोमर्डा मंडळात फिरत आहे. हरी असे या हत्तीचे नाव असून, या व्हिडिओत तो हातपंप चालवून त्याची तहान भागवत असताना दिसतो आहे.