Amruta Fadnavis Garba : अमृता फडणवीस यांनी लुटला गरबा खेळण्याचा आनंद; पाहा व्हिडिओ - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 22, 2023, 9:00 AM IST
नागपूर Amruta Fadnavis Garba : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस शनिवारी (21 ऑक्टोबर) नागपूरमधील विविध गरबा पंडालला आवर्जून भेटी दिल्या. तसंच यावेळी अमृता फडणवीस यांना गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. गाण्याच्या तालावर त्यांनी लहानं मुलांसह महिलांसोबत गरबा खेळण्याचा अगदी मनमुराद आनंद लुटलाय. आपलं राज्य देशात कायमचं नंबर एकवर राहो, अशी अमृता फडणवीस यांनी देवीकडं प्रार्थना केली. तसंच राज्यात सुख, शांती नांदो यासाठी देवीकडे प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच मला नवरात्रीत पंडालला भेट द्यायला खूप आवडतं, म्हणून मी इथं आले आहे, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, अमृता फडणवीस यांचा गरबा खेळण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे बघायला मिळतंय.