अमेठीत शिक्षकाने 8 वर्षीय विद्यार्थ्याला बुटांनी मारले - Amethi teacher beats 8 year old student
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16144780-thumbnail-3x2-teacher.jpg)
अमेठीमध्ये विद्यार्थ्याला मारहाणीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अमेठीतील शिक्षकाने 8 वर्षीय विद्यार्थ्याला बुटांनी मारले. संतप्त कुटुंबीयांनी या घटनेची तक्रार गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील मुसाफिरखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चकबहेर गावातील प्राथमिक शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला बुटाने मारहाण केली. शाळेतून बाहेर पडताना मुलांचे भांडण सुरू होते. ते पाहून शिक्षक अमित यादव यांनी 8 वर्षाच्या तिसरीतील विद्यार्थ्याला बुटाने मारहाण केली. याची माहिती मिळताच मुलाचे वडील धर्मराज यादव यांनी गटशिक्षणाधिकारी यांना तक्रार पत्र देऊन मारहाण करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST