police saved Passenger : तोल जाऊन रेल्वेतून खाली पडला, पोलिसाने जीवाची बाजी लावून वाचवले प्राण - police save life Passenger
🎬 Watch Now: Feature Video
अकोला : अकोला रेल्वे स्थानक येथे चालत्या रेल्वेत चढण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशांचे प्राण लोहमार्ग पोलिस कर्मचाऱ्याने वाचविले आहे. ही घटना रेल्वे स्थानक फलाट क्रमांक एक वर सोमवारी रात्री घडली. विदर्भ एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशन येथून रवाना होत असताना एक प्रवाशी रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेनमध्ये चढताना त्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील गॅपमध्ये पडत पडत होता. त्यावेळी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी हेडकॉन्स्टेबल बक्कल क्रमांक 413 विलास पवार हे गस्त घालत असताना त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या प्रवाशाच्या दिशेने धाव घेतली. वाचवण्यासाठी जीवाचा पर्वा न करता त्या प्रवाशाला पकडून बाहेर ओढले. त्यामुळे त्या प्रवाशाचे प्राण वाचले. यावेळी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या इतरही प्रवाशांनी धाव घेत पोलिस कर्मचारी पवार यांना हात देत त्या प्रवाशाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला.
प्रवाशाचा वाचविला जीव : चालत्या रेल्वेत चढण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असताना प्रवाशाला तिथे असलेल्या फेरीवाल्याने हटकले. मात्र, तो प्रवाशी ऐकण्यास तयार नव्हता. तरीही तो प्रवाशी रेल्वेत चढण्यास धजवला. चढण्याचा प्रयत्न करताना प्रवाशी फलाट आणि रेल्वे रूळ यांच्या मध्येच अडकत रेल्वेसोबत फरपटत जात होता. इतरही प्रवाशांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. तोपर्यंत पोलिस कर्मचारी विलास पवार यांनीच धाव घेत त्या प्रवाशाचा जीव वाचविला.
याआधीही वाचविले प्रवाशांचे प्राण : लोहमार्ग पोलिस कर्मचारी हे रेल्वे स्थानक येथील फलाटावर रेल्वे आल्यानंतर गस्तीवर असता. जोपर्यंत रेल्वे जात नाही, तोपर्यंत पोलिस कर्मचारी तिथे गस्त देत असतात. अशाप्रकारे गस्त घालत असताना पोलिस कर्मचारी विलास पवार यांनी याआधी दोन वेळा इतरही प्रवाशांचे प्राण वाचविले आहे.त्यामुळे पोलिस कर्मचारी पवार यांचे कौतुक होत आहे.