Ajit Pawar News : उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंना जमलं.. मुख्यमंत्री होण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठ विधान म्हणाले... - CM Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 10, 2023, 3:17 PM IST
पुणे : Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिली नाही. परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमताचे आकडे सुद्धा लागतात. त्याचबरोबर नशिबाची साथ हवी. नशिब आल्यानंतर मुख्यमंत्री होता येईल अशी प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar On Banner Of Future CM) यांनी आज पुण्यात दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी पुण्यातून निघताना त्यांनी भव्य असे शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या जिजाई बंगल्यापासून मोठी रॅली काढण्यात आली होती. दौऱ्यावर निघण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
नशिबात असेल तर होईल : राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठीच अजित पवार भाजपासोबत गेल्याची चर्चा आहे. परंतु ते नेमकं कधी होणार अशी सुद्धा चर्चा सतत होत असते. त्यावर अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री होण्यासाठी 145 बहुमताचा आकडा तर हवाच, त्याचबरोबर नशीबही लागते. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जमलं, (CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जमलं. आपल्याही नशिबात असेल तर होईल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.