Ajit Pawar Vedanta Foxconn Controversy : कोणाच्या तरी दुर्लक्षामुळे प्रकल्प राज्याबाहेर जातो, हे सहन होणार नाही - अजित पवार - Vedanta Foxconn project

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 15, 2022, 1:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉन वेदांता ( Vedanta Foxconn project ) हा प्रकल्प राज्यात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न झाले होते. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे. या प्रकल्पासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा सुरुवातीला विचार करण्यात आलेला होता. आमचा कोणत्याही राज्याला विरोध नाही, पण आमच्या राज्यातील प्रकल्प कोणाच्या तरी दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल तर ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही ते ( ajit pawar Criticize Shinde-Fadnavis Govt ) म्हणाले. आम्ही ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लक्षात आणून दिलेली ( Eknath Shinde Govt ) आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जावं, प्रयत्न करावेत. या प्रकल्पासाठी तळेगाव येथील जमीन देखील निश्चित करण्यात आलेली होती. प्रकल्पासाठी त्या ठिकाणी सर्व गोष्टी पूरक होत्या. हा प्रकल्प गुजरातला नेल्यानंतर आता गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे. ज्या प्रकल्पामुळे राज्याचे हित होत असेल पर्यावरणाचं संवर्धन राखलं जात असेल, असे प्रकल्प महाराष्ट्रात आलेच पाहिजेत, या मताचे आम्ही असल्याचेही अजित पवार म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.