अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं साडेतीन एकर ज्वारीचं पीक उद्धवस्त ; हातातोंडाशी आलेलं पीक गेलं पाण्याखाली! - Ahmednagar rain news

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 2:19 PM IST

अहमदनगर Unseasonal Rain In Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी (26 नोव्हेंबर) रात्री झालेल्या  अवकाळी मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसामुळं कापूस, मका, हरभरा, गव्हाचं नुकसान झालं आहे.  शिर्डी विमानतळाजवळील दीपक गुंजाळ या शेतकऱ्यानं आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर ज्वारीची लागवड केली होती. हे ज्वारीचं पीक डोक्याएवढं झालं असताना रविवारी झालेल्या मुसळधार पावसानं अख्ख साडेतीन एकर ज्वारीचं पीक उद्धवस्त झाले.  यासंदर्भात बोलत असताना शेतकरी दीपक गुंजाळ म्हणाले की, आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. मात्र, अद्यापही महसुलचे अधिकारी पंचनामे करण्यासाठी आले नाहीत. सरकारनं तातडीनं पंचनामे करून आम्हाला भरपाई देण्यात द्यावी, अशी मागणीही यावेळी गुंजाळ यांनी केलीय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.