leopard Dead In Farm : उसाच्या शेतात आढळला मृत अवस्थेत बिबट्या... - leopard Dead In Farm
🎬 Watch Now: Feature Video
बीड : गेले काही दिवसापासून तालुक्यातील डोंगराळ भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. याच बिबट्याने अनेक लोकांच्या शेळ्या, मेंढ्या, गाई मारल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबटे असल्याचे वन विभागाने सांगितले आहे. परंतु आज बीडच्या वडवणी तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या चिखल या गावामध्ये एका उसाच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र मृत बिबट्या हा किमान 24 तासापूर्वीच मृत झाल्याचे सांगण्यात आले. शेतकरी बाबुराव तांदळे यांच्या उसाच्या शेतात, हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. तांदळे यांच्या सालगड्याने शेतामध्ये दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने, सर्व शेताची पाहणी केली. तेव्हा मृत अवस्थेत हा बिबट्या आढळला. मानवी रहदारीच्या शिवारात उसाच्या शेतात सदरील बिबट्या आढळल्याने, परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा केला आहे.