पुण्यात सिलेंडरचा स्फोट; एकाच वेळी फुटले 10 सिलेंडर - सिलंडरचा स्फोट
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 27, 2023, 6:26 PM IST
पुणे Silander Sfot : पुण्यातील विमान नगर परिसरात (Viman Nagar Pune) आगीची मोठी घटना घडली आहे. पुण्यातील विमान नगर येथील सिंबोयासिस कॉलेज (Symbiosis College Pune) जवळ असलेल्या रोहन मिथिला इमारतीलगत आज दुपारच्या सुमारास 10 सिलेंडरचा स्फोट (10 Cylinders Explode) होऊन आगीची घटना घडली. त्याठिकाणी 100 हून अधिक सिलेंडर असल्याने मोठी भीती व्यक्त केली जात होती. पण आगीची घटना घडल्यावर अग्निशमन दलाकडून 3 वाहने तत्काळ रवाना करण्यात आली. आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आग का लागली याचं कारण अजूनही समोर आलं नाही. तसंच आता अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात आली आहे. बांधकामाच्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा का करण्यात आला होता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.