Children Vaccination Jalgaon : जळगावात बालकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी लसच मिळाली नाही.. नियोजन बिघडले - कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी लसच नाही
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव- केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी ( Children Vaccination Jalgaon ) दिली. बुधवारपासून लसीकरणाचे नियोजन होते. मात्र, ‘बायोलॉजिकल-ई’ची लस “कोर्बाेव्हॅक्स’ अद्यापही जळगाव जिल्ह्यात उपलब्ध झालेली ( Covid Vaccine Not Available In Jalgaon ) नाही. परिणामी बुधवारपासून नियोजित लसीकरण होणार नाही. आज किंवा ऊद्या लस ऊपलब्ध झाल्यावर शुक्रवार किंवा शनिवारपासून १२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू होईल.
१५ ते १७ चे लसीकरण सुरु
शहरात १५ ते १७ वयोगटातील बालकांना ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले होते. या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन लस वापरण्यात आली होती. यानंतर १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाची उत्सुकता होती. केंद्र शासनाने बुधवारपासून लसीकरणाचे नियोजन केले होते. मात्र, बालकांना देण्यात येणारी कोर्बाेव्हॅक्स ही लस अद्याप शहरात उपलब्ध झाली नाही. ही लस साधारण गुरुवार किंवा शुक्रवारी शहरात उपलब्ध होईल, यानंतर शहरात लसीकरण सुरु केले जाणार आहे.
फारसा प्रतिसाद नाही
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर आता ओसरला आहे. यामुळे प्रत्यक्षात लस शहरात उपलब्ध झाल्यावर कसा प्रतिसाद मिळेल? याबाबत शंका आहे. सध्या १५ प्लस वयोगटाचे लसीकरण सुरु आहे. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद नाही. असेही मत आरोग्य विभागाने व्यक्त केलेय. तर 12 + चे लसीकरण लस उपलब्ध झाल्यावर सुरू करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी जमादार यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST