Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या नावाला फासले काळे; कोंढवा येथील मुस्लिम कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला निषेध
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत मशिदींवरील भोंगे काढले नाही तर त्यापेक्षा दुप्पट आवाजात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा दिला. त्यानंतर राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून मनसेच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम दिसले तर शहरातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. कोंढवा येथील नुरानी कब्रस्थानच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. राज ठाकरे यांनी भोंगा विरोधी भूमिका घेतल्याने नूरानी कब्रस्थान येथील उद्घाटनाच्या शिलालेखावरील राज ठाकरे यांच्या नावाला काळा रंग लावून निषेध ( Muslims MNS Worker Faded Black Color On Inauguration Stone ) दर्शवला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST