Video : 'इतक्या वर्षात शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज देऊ शकत नाही, ही शोकांतिका' - आमदार सदाभाऊ खोत
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणा राज्यामध्ये जमिनी घेत आहेत व तिथे शेती करत आहे अशी माहिती समोर आल्यानंतर या विषयी बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले आहे. राज्याच्या सीमेवर राहणारे शेतकरी बांधव इतर राज्यांमध्ये अशा पद्धतीने शेती करत आहेत. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे तेलंगणा सारखे राज्य तिथे तिथल्या जनतेला 24 तास वीज देत आहे ज्या राज्याची निर्मिती काही वर्षांपूर्वी झाली. परंतु महाराष्ट्रामध्ये आज साठ वर्ष होऊन सुद्धा येथील सरकार जनतेला हा पूर्ण वेळ वीज देऊ शकत नाही ही शोकांतिका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST