Minister Bhujbal Helped Accident Victims : मंत्री भुजबळांनी केली अपघातग्रस्तांची मदत, ताफ्यातील गाडीतून पोहचविले रुग्णालयात - मंत्री छगन भुजबळ
🎬 Watch Now: Feature Video

नाशिक - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील कार्यक्रमातून परतत होते. त्यावेळी पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघात झाला ( Accident On Pune Highway ) होता. यावेळी भुजबळ यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवित तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी आपल्या कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत सिन्नर येथील रुग्णालयात ( Minister Bhujbal Helped Accident Victims ) पाठविले. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी स्वीय सहायकाला सूचना करत सिन्नर येथील डॉक्टरांना माहिती देऊन योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे मार्गस्थ झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST