VIDEO: दहिसर परिसरात डोक्यावर दगड पडल्याने व्यक्तीचा मृत्यू.. घटना सीसीटीव्हीत कैद - stone fall Man death dahisar
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दहिसर परिसरातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. दहिसर परिसरातील महालक्ष्मी एसआरए सोसायटीमध्ये बुधवारी सकाळी 8:48 च्या सुमारास एक व्यक्ती त्याच्या मित्रासोबत एका दुकानासमोर उभे राहून गप्पा मारत होता. या दरम्यान इमारतीच्या वरच्या माळ्यावरून एक दगड त्या व्यक्तीच्या डोक्यावर पडला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना 23 मार्च ला घडली. कल्याण गिरी (वय 40) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST