BJPs Reaction On ED Action : कर नाही त्याला डर कशाला : आशिष शेलार, राजीनामा द्या : राणेंची मागणी, निर्दोष असेल तर सुटका : बावनकुळे - ईडी कारवाई चंद्रशेखर बावनकुळे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने ठाण्यात आज मोठी कारवाई केली ( ED Action Sridhar Patankar )आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भावावर ईडीने कारवाई करत पुष्पक बुलियन प्रकरणात ६ कोटींची मालमत्ता जप्त केली ( Pushpak Bullian Case )आहे. त्यावर आता भाजपकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आमदार आशिष शेलार यांनी या संदर्भामध्ये बोलताना 'कर नाही त्याला डर कशाला' असं सांगितल आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी, "न खाऊंगा ना खाने दुंगा" असं सांगितल्याची आठवणही त्यांनी या प्रसंगी करून ( Ashish Shelar On ED Action) दिली. विधान भवनात ते बोलत होते. तर नितेश राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली ( Nitesh Rane On ED Action) आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाई सूडबुद्धीने नसून, निर्दोष असेल तर या प्रकरणातून सुटका होईल, अशी प्रतिक्रिया दिली ( Chandrashekhar Bawankule On ED Action) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST