Lemon Price Nagpur : नागपुरात लिंबाचे भाव कडाडले, लिंबू शरबत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर - आजचे लिंबाचे बाजार भाव
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - उन्हाळ्याची चाहूल लागताच भारतातील सर्वात लोकप्रिय पेय असलेल्या आंबट-गोड लिंबू शरबताची सर्वांना आठवण होते. कितीही थकवा येऊ दे लिंबू शरबत पिल्यानंतर उन्हाचा शिन कसा क्षणात दूर होतो, म्हणूनच उन्हाळ्याच्या हंगामात लिंबूला सर्वाधिक मागणी असते. दर उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढतात, मात्र यावर्षी तर लिंबूचे दराने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. एरवी नागपूरच्या घाऊक बाजारात 2 रुपयांला मिळणाऱ्या आजचे लिंबाचे बाजार भाव हे गगनाला भिडले आहेत. आज नागपुरात लिंबाचे भाव कडाडले ( Lemon Price hike in nagpur market ) असून दर हे प्रत्येकी एक लिंबू 10 ते 15 रुपयांवर पोहोचला आहे. यावर्षी लिंबूची आवक फारच कमी असल्यामुळे लिंबाचे भाव कडाडले आहेत, त्यामुळे यंदा सर्वांच्या आवडीचे लिंबू शरबत आवाक्याबाहेर गेले आहे. लिंबूचे दर कडाडल्याने सर्वाधिक आवडीचे लिंबू शरबत महाग झाले आहे, यावर्षी लिंबू भलताच भाव खात असल्याने शरबतची चव कमी झाली आहे. नागपूरच्या ठोक बाजारात कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेशमधून लिंबाची आवक होते, मात्र यावर्षी आवक अत्यंत कमी झाली आल्याने दर वाढले आल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST