133 years old tradition of Holi in Jalna : जालना शहरात प्रतिकात्मक हत्तीवरून फुलांची बरसात, १३३ वर्षांच्या परंपरेप्रमाणे धुळवड साजरी

By

Published : Mar 18, 2022, 4:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

thumbnail

जालना - शहरात धुलीवंदन हत्ती रिसाला समितीच्यावतीने ( Hatti Risala committee ) वाजत गाजत धुळवड साजरी करण्यात आली आहे. गेल्या 133 वर्षांपासून जालना शहरात धुलीवंदन हत्ती रिसाला समितीच्यावतीने धुळवड साजरी करण्याची अनोखी परंपरा ( Holi celebration in Jalna ) आहे. या परंपरेत शहरातील वेगवेगळ्या गल्लीतून प्रतिकात्मक बनवलेल्या हत्तीवर फुलांची बरसात केली जाते. त्यानंतर हत्तीवर बसलेला राजा हा नागरिकांना प्रसाद म्हणून रेवड्या फेकत प्रसादाचे वाटप करतो. ही मिरवणूक गल्लीतून बाहेर गेल्यानंतर कुणीही रंग न खेळण्याची 133 वर्षांपासूनची जुनी प्रथा ( 133 years Holi celebration tradition in Jalna ) आहे. याच परंपरेनुसार शहरातील नागरीकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन गाण्यांच्या धुळवड साजरी केली. मिरवणुकीवेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.