Uttarakhand : गोठवणाऱ्या थंडीतही भारतीय जवानांचा साहसी पराक्रम, सीमेवर रंगला व्हॉलीबॉल सामना - Indian Army Soldiers Video
🎬 Watch Now: Feature Video

भारतीय लष्करातील जवान कोणत्याही वातावरणात, प्रतिकूल परिस्थितीत देशाचे संरक्षण करत असतात. हवामानाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर हिमालयासारखे जवान उभे असतात. सध्या चीनजवळ असलेल्या उत्तराखंडमधील बॉर्डर आउट पोस्टवरील जवानांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 15,000 फूट उंचीवर -20 अंश सेल्सिअस तापमानात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) व्हॉलीबॉल खेळताना ( ITBP personnel play volleyball ) दिसून आले. हा व्हिडिओ बघून अनेकांनी जवानांना सलाम केला आहे. एवढ्या बर्फातही जवान जोशमध्ये असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारे जवान हे कडाक्याच्या थंडीचा मुकाबलाच करत नाही आहेत तर तिचा आनंद देखील लुटत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST