Women's Day 2022 : कोरोनाकाळात मला नर्स आणि महिला डॉक्टरांमध्ये माझ्या आईच प्रतिबिंब दिसायचं : राजेश टोपे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
जालना : कोरोना काळात मी आईला गमावलं असलं तरी मला नर्स, महिला डॉक्टर्स यांच्यात माझ्या आईचं प्रतिबिंब दिसत होतं. त्यांच्यामुळेच आपण कोरोनावर मात केली, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त ( International Women's Day 2022 ) राजेश टोपे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली ( Rajesh Tope Reacted On Women's Day ) आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून टोपे यांनी महिलांसाठी आरोग्य विभागाच्या योजनांचीदेखील माहिती दिली ( Maharashtra Government Schemes For Womens ) आहे. महिलांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांची जनजागृती केली जाणार असून, कोरोना काळात तसेच राज्य सरकारच्या विविध विभागात काम करत असलेल्या महिलांना टोपे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सलाम केला आहे. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव देखील केला आहे. आज महिला विविध क्षेत्रात कौतुक करावे असे काम करत असून, राज्याच्या आरोग्य विभागात महिलांचे काम उल्लेखनीय असल्याचं सांगत टोपे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.