Yuvasena Thali Bajaw Andolan : नागपुरात महागाईच्या विरोधात युवासेना आक्रमक, थेट स्मृती इराणींना दिले 'चॅलेंज' - पेट्रोल डिझेल गॅस भाव वाढ
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या युवासेनेकडून आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. यावेळी उपराजधानी नागपुरातही महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 'थाळी वाजवा आंदोलन' करण्यात ( Yuvasena Thali Bajaw Andolan Nagpur ) आले. पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे ( Petrol Diesel Gas Price Hike ) आर्थिक भार हा सामान्य कुटुंबांना सोसावा लागत आहे. यावेळी मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी ( Yuva Sena Challenge To Smriti Irani ) यांनी सत्तेत नसतांना आंदोलन करत होत्या. आता त्यांना महागाई दिसत नाही का, असाही सवाल उपस्थित करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST