शिवज्योत घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या शिवभक्तांसाठी दूध, अल्पोपहाराची मोफत सोय - शिवभक्तांसाठी अल्पोहार शरद पोखरकर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14515543-thumbnail-3x2-op.jpg)
पुणे - आज 19 फेब्रुवारी असून गावागावात शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत घेवून जात असतात. अशा शिवभक्तांची गैरसोय होत असते म्हणून पुणे - नाशिक महामार्गावरून शिवज्योत आणण्यासाठी जाणारे शिवभक्त आणि ज्योत घेऊन येणाऱ्या शिवभक्तांना दूध आणि अल्पोहार देण्यात आले. मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयासमोर ट्रक अँड ट्रेल मंचरचे संचालक शरद पोखरकर, रोटरी क्लब ऑफ मंचर, अध्यक्ष अरुण चिखले सचिव आदिनाथ थोरात, शिवगिरी मंगल कार्यालय संचालक सतीश बेंडे पाटील, चिंतामणी ज्वेलर्सचे संचालक सचिन काजळे, सचिन नामदेव बांगर व हाॅटेल वरद यांच्या माध्यमातून दुध, चहा, पाणी बॉटल्स आणि पोटभर अल्पोपहार देण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST