#Christmas2020: रोझ कुकीजसोबत बनवा तुमचा ख्रिसमस 'कुरकुरीत'! - रोझ कुकीज् व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - आजच्या पदार्थाच्या उगमाची गोष्ट खूपच रंजक आहे. ख्रिसमस रेसीपीज् मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कुरकुरीत 'रोझ कुकीज्'. मैदा, साखर आणि अंड्याचा वापर होत असलेल्या या कुकीज् दक्षिण भारतात खूपच प्रसिद्ध आहेत, विशेषत: केरळमध्ये. या पदार्थाचा उगमच केरळमध्ये झाल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते, भारतीयांना पदार्थ बेक करणे ब्रिटिशांनी शिकवले. या कुकीज् ही त्यांच्यासोबतच केरळमध्ये आल्या असाव्यात. या पदार्थाला तेलुगुमध्ये 'गुलाबी पुव्वालू', तमीळमध्ये 'अच्चा मुरुक्कू' आणि मल्याळममध्ये 'अचापम', असे म्हणतात.