'असे' तयार करा बडीशेपचे सरबत - बडीशेप सरबत लॉकडाऊन रेसिपी
🎬 Watch Now: Feature Video
आपल्याला माहितीच आहे, की बडीशेप ही पचनासाठी चांगली असते. पण, तुम्हाला हे माहिती आहे का? बडीशेपमुळे शरीरातील उष्णता देखील कमी होते. त्यामुळे अगदी ताजेतवाने राहण्यास मदत होते. बडीशेप कोरडी खाण्यापेक्षा सरबत करून प्यायले तर ते शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरते. त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, 'बडीशेप सरबत'ची ही रेसिपी...नक्की ट्राय करा...