Fire in Freedom Fighters Express : मधुबनी रेल्वे स्थानकावर स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेसला भीषण आग, पाहा VIDEO - मधुबनी रेल्वे स्टेशन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 20, 2022, 4:54 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

मधुबनी (बिहार) - बिहारमधील मधुबनी रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेसच्या ( Fire in Freedom Fighters Express ) तीन रिकाम्या डब्यांना अचानक आग ( Fire in a standing train in Madhubani ) लागली. काही वेळातच ट्रेनच्या डब्यांमधून आगीच्या लाटा उसळू लागल्या होत्या. आगीमुळे धुराच्या लोटाने संपूर्ण स्टेशन परिसरात अंधार झाला होता. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे, स्वातंत्र्य सैनिक एक्स्प्रेस जयनगर येथून निघून नवी दिल्लीला जाते. शनिवारी सकाळी 09.13 च्या सुमारास समस्तीपूर विभागातील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस ट्रेनला अचानक आग लागली. तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्यात आली. डब्बे पूर्णपणे रिकामे होते त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र आग एवढी भीषण होती की काही क्षणात पूर्ण रेल्वे जळत होती. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास सरकारी रेल्वे पोलीस/रेल्वे संरक्षण दल करत आहे. याची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.