Video : ई-स्कूटरला लागलेल्या आगीत वडील आणि मुलीचा मृत्यू - विषारी धूर
🎬 Watch Now: Feature Video
वेल्लोर (तामिळनाडू) - चिन्ना अल्लापुरम येथील दुरईवर्मा (वय, 49) आणि त्यांची मुलगी मोहना प्रीथी (वय १३) यांचा घरी झालेल्या एका भीषण अपघातात मृत्यू झाला. दुराईवर्मा यांनी अलीकडेच एक ई-स्कूटर खरेदी केली. काल रात्री त्यांनी चार्जिंगसाठी बाइक लावली आणि झोपला. मध्यरात्री बाईकचा अचानक स्फोट होऊन आग लागली आणि विषारी धूर त्यांच्या घरात पसरला. घरात गुदमरल्याने वडील आणि मुलगी दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST