Priyanka Chopra in see-through dress : अंबानी इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राचा सी-थ्रू ड्रेस, शोमध्ये मारली बाजी - प्रियांका खूप वर्षांनी भारतात
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या उद्घाटनाला उपस्थित राहण्यासाठी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास शुक्रवारी भारतात आली. मुंबई विमानतळावर तिचा अमेरिकन पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास यांच्यासोबत दुपारी दिसलेल्या या अभिनेत्री प्रियांकाने रात्री अंबानींच्या कार्यक्रमात उपस्थितांना चक्रावून सोडले. NMACC उद्घाटन समारंभासाठी, प्रियांकाने केपसह सी-थ्रू ड्रेसची निवड केली. प्रियांका या अनोख्या स्टाईलच्या आकर्षक ड्रेसमध्ये पती निक जोनाससोबत हजर होती. बॉलिवूड सेलेब्रिटींच्या या मांदियाळीत सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात प्रियांका यशस्वी ठरली. प्रियांका खूप वर्षांनी भारतातील अशा भव्य सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहिली होती. त्यामुळे अनेक सेलेब्रिटी तिला भेटत होते व तिच्याशी गप्पा मारत होते. निक जोनाससाठीही हा सोहळा खास होता.