thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 12:17 PM IST

ETV Bharat / Videos

Janhvi Kapoor at Tirupati Temple : जान्हवी कपूरने पारंपरिक वेशात घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिरुपती बालाजीची भक्त आहे. ती नेहमी तिरुमाला मंदिरात दर्शनासाठी येत असते. सोमवारी सकाळी तिने मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी ती दक्षिण भारतीय पारंपरिक वेशभूषेत दर्शनासाठी आली होती. जान्हवी अनेकदा तिरुपतीच्या मंदिरात येते तेव्हा तिच्यासोबत कोणीतरी कुटुंबाचे सदस्य असतात, यावेळी मात्र ती एकटीच दर्शनासाठी आली होती. कामाच्या आघाडीवर जान्हवी अलिकडेच नितीश तिवारी दिग्दर्शित 'बवाल' चित्रपटात वरुण धवनसोबत झळकली होती. आता ती 'मिस्टर अँड मिसेस माही' या स्पोर्ट्स ड्रामामध्ये राजकुमार रावसोबत काम करत आहे. याशिवाय जान्हवी साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची मुख्य भूमिका असलेल्या 'देवरा' चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी मार्च महिन्यात तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक कोरटला सिवा करत असून सैफ अली खानची यात महत्त्वाची भूमिका असेल.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.